Politiks : अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबाना मदत देतांना मुख्यमंत्री करतात राजकरण .आमदार भास्कर जाधव यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर टीका.

पुणे दिनांक १८जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) राज्यात पावसाळी विधिमंडळ अधिवेशन सुरू झाले आहे.आजचा अधिवेशनांचा दुसरा दिवस असून पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या सत्रात आज आज अनेक नेत्यांची भाषणे झाली .तसेच चर्चा देखील झाली. या मध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात. विजय वटेट्टीवार .व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आमदार भास्कर जाधव. यांची भाषणे झाली. पण दणदणीत भाषण करून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत गुहागर येथील अपघात ग्रस्तांसाठी कुंटूबांला फक्त ते आपल्या मतदार संघात ये आसल्यांने मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देत नाही. अशी टिकाच जाधव यांनी केली आहे.
या वेळी आमदार भास्कर जाधव यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. माझा गुहागर मतदार संघात भीषण अपघात झाला होता. त्या अपघातात एकाच कुटुंबातील एकूण नऊ जणांचा दुदैवी अपघातात मृत्यू झाला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो माझा मतदार संघ असल्या मुळे त्या कुंटूबाला जाणून बुजून मदत जाहीर केला नाही. असे टीकास्त्र सोडले.तुम्ही एवढे निष्ठुर व निर्दयी कसे झालात ? असा सवाल या वेळी भास्कर जाधव यांनी केला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.