Politiks : महाराष्ट्रात बी आर एस पक्षाची बीजे रोवू पहाणारे तेलांगणाचे मुख्यमंत्री यांना होमपीचवरच झटका १८.बी आर एस च्या नेते काँग्रेस पक्ष प्रवेश साठी डेरे दाखल.

पुणे.दिनांक २६.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम )तेलंगणा नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या पक्षाची बीजे रोवू पहाणारे बी आर एस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व मुख्यमंत्री के.सी. आर. यांना त्यांच्या होमपीचवर ' झटका ' बसला असून त्यांच्या सत्ताधारी बी. आर. एस. पक्षाचे १८.नेते आज दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात डेरे दाखल झाले आहेत. बी आर. एस. पक्षाचे माजी खासदार पी. एस. रेड्डी. माजी मंत्री कृष्ण राव यांच्यासह अन्य नेते मंडळी आज काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहोत.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी. आज सोमवार दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात या नेत्यांचे स्वागत करणार आहेत. अतिमहत्त्व कांशी सत्ताधारी बी. आर. एस. पक्षाला मोठे ' खिंडार पडणार आहे. ' बी. आर एस. च्या या या बंडखोर नेत्यांनी पक्ष प्रवेश आधी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यां बरोबर चर्चा करणार आहे. या चर्चेत अविभाजित खम्मम व महबूबनगर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना बैठकीत साठी बोलविण्यात आले आहे.
या बैठकीत बी. आर. एस.व भारतीय जनता पक्षाचे ही काही नेते उपस्थित राहणार आहेत. असे काँग्रेस पक्षाच्या सूत्रांकडून माहीती मिळत आहे.या दोन्ही नेत्यावर पक्ष विरोधी कारवया साठी एप्रिल महिन्यात भारतीय राष्ट्र समिती पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.या सर्व घडामोडीं नंतर अजून काही काही नेते मंडळी काँग्रेस पक्षात जाणार असल्याची माहीती मिळत आहे.या मुळे तेलंगणा मधील सत्ताधारी पक्षाला मोठा झटका बसणार आहे .या मध्ये तिळ मात्र शंका नाही. तेलंगणचे मुख्यमंत्री व बी. आर.एस. पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर राव. यांनी अतिशय चाणक्य नितीने राजकीय टायमिंग साधले आहे महाराष्ट्रातील आराध्य दैवत विठ्ठलाच्या आषाढी वारी चा मुहूर्त साधूनच पंढरपूरच्या दिशेने आपल्या पक्षाचे संपूर्ण मंत्री मंडळ घेऊन बायरोड तेलंगणातून सोलापूर जिल्ह्य़ात त्यांचा प्रवेश डेरे दाखल होईल. त्यांच्या पक्षाच्या वतीने सर्व वारी मार्गवर मोठ मोठे होर्डिग्ज लावले आहेत. व आपल्या पक्षाची मोठी जाहीरात केली आहे. वारीच्य दिवशी मंदिर परिसरात हेलीकॉप्टर द्वारे पुष्प फुले उधाळणार आहेत.त्यांनी आषाढी वारीचे अचूक पणे टायमिंग साधून आपल्या पक्षाचे लाखो वारकरी समोरच महाराष्ट्रात झकास अशी इन्टरी केली आहे. त्यांनी या पूर्व नांदेड. विदर्भ. व महाराष्ट्रांची उपराजधानी नागपूर येथे जाहीर सभा घेतल्या आहेत. व नागपूरात आपल्या पक्षाचे कार्यालय देखील चालू केले आहे.तसेच आषाढी एकादशीचे अचूक असे. राजकिये टायमिंग साधत बी. आर.आर एस.पक्षाचे सर्व मंत्री मंडळ पदाधिकारी. व नेतेमंडळी. कार्यकर्ते आज पंढरपूरात विठ्ठलाच्या चरणी ताफा बायरोड घेऊन डेरेदाखल होत आहेत. कानाडया विठ्ठलाच्या भेटी साठी संपूर्ण भारतातून वारकरी येत असतात. याचाच लाभ घेण्या करीता राव यांच्या भारतीय राष्ट्र समितीने अचूक टायमिंग साधण्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र. कर्नाटक. आंध्रप्रदेश. मधून येणाऱ्या वारकरी यांच्या समोरच बी.आर. एस. पक्षाचे शक्ती प्रदर्शन होणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.