Politiks : मुख्यमंत्री सह कुंटूब अचानक दिल्ली दौ-यावर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण

पुणे दिनांक २२( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटूंब आज दिल्ली दौ-यावर आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून त्यांच्या बरोबर पत्नी लता शिंदे मुलगा खासदार श्रीकांत शिंदे. वडील संभाजी शिंदे आहेत. १८ जुलैला झालेल्या 'एन डी ए' बैठकीला देखील मुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते. त्यानंतर ते पुन्हा आज दिल्ली दौ-यावर असल्या मुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
रायगडच्या इर्शाळवाडीती दुर्घटनेनंतर आवश्यक त्या सुचना दिल्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक पणे थेट दिल्ली गाठली .त्यांचा हा दौरा नियोजित नसून ते वैयक्तिक कामासाठी दिल्ली दौ-यावर असल्याचे सांगण्यात येत आहे .या दौ-यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या भेटी नंतर ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. सध्या विधीमंडाळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे या अधिवेशनानंतर रखडलेला मंत्री मंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सरकार मध्ये सामील झाल्या नंतर त्यांच्या बरोबर राष्ट्रवादीच्या ( अजित पवार गट ) ९ मंत्र्यांनी शपथ घेतली मात्र .या मुळे शिवसेनेच्या ( शिंदे गट) आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे बोललं जात आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौ-यात या संदर्भात काही निर्णय होणार का ? हे पाहणं देखील महत्त्वाचे असणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.