संभाजी राजेंची पत्रकार परिषद मराठा तरुणांच्या आत्महत्यांमुळे माझं मन व्यथीत : मराठा आरक्षणावरून सरकारने समाजाची फसवणूक करु नये!

पुणे दिनांक ८ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेली ११ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात सरकार विरोधात उपोषण सुरू केले आहे.यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आता मराठा आरक्षणा साठी प्रश्न पेटलेला आहे.परंतू यांचं दरम्यान मराठा आरक्षणा साठी काही तरुणांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत.या पार्श्वभूमीवर आता माजी खासदार संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेऊन.या तरुणांच्या आत्महत्यांमुळे मन व्यथीत झाल्याची भावना व्यक्त केल्या आहे.
दरम्यान संभाजी राजे म्हणाले की ' माझं मन व्यथीत झाल्याने पत्रकार परिषद घेत आहे.मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी साठी व मराठी समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी उपोषण आंदोलने सुरू आहेत. मराठा समाजातील दोन तरुणांच्या आत्महत्यांमुळे मी व्यथित झालो आहे.' ते पुढे म्हणाले की " जरांगे पाटील हे सामान्य कुटुंबातील असून स्पष्टपणे आपली भूमिका व्यक्त करणारी व्यक्ती आहे.त्यांची मागणी आहे की मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळावे.हे कुणबी आरक्षण टिकणार असेल तरच कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवे.नाहीतर सरकारने मराठा समाजाची फसवणूक करु नये.जरांगे पाटील यांच्यासोबत आम्ही ठामपणे उभे राहणार आहेत." असेही संभाजी राजे म्हणाले.
दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की. " तत्कालीन मुख्यमंत्री यांनी आरक्षण दिले.पण ते सुप्रीम कोर्टात टिाकले नाही मराठ समाज सामाजिक दुृष्ट्या मागासलेला नाही.असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते.त्यानंतर मी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना या संदर्भात पत्र पाठवले होते.पण त्यांच्या कडून सांगण्यात आले की.वकिल खुप महागडे आहेत ." असे संभाजी राजे यावेळी म्हणाले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.