SHIVSENA MLA DISQUALIFIED : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी १४ सप्टेंबर रोजी होणार सुनावणी

पुणे दिनांक ९ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) बऱ्याच दिवसांन पासून रखडलेली शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणांची सुनावणी आता लवकरच सुरू होणार आहे.या करीता दोन्ही गटांच्या शिवसेना आमदार यांना नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे.अशी माहिती विधिमंडळांच्या खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणांबाबत मोठी माहिती हाती आली असून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणांची सुनावणी पुढील आठवड्यात १४ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे.सुनावणी साठी उध्दव बाळासाहेब ठाकरे गट व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट या दोन्ही गटांच्या शिवसेना आमदार यांना नोटीस बजावण्यास सुरुवात झाली आहे.मुख्यमंत्री शिंदे गटाच्या ४० तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या १४ शिवसेना आमदार यांना अपात्रता प्रकरणाबाबत संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे.अशी खात्रीलायक माहिती विधिमंडळाच्या सूत्रांन कडून मिळत आहे.या सर्व आमदार यांना विधीमंडळ अध्यक्षां कडून त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार देण्यात येणार आहे.यावेळी या सर्व आमदारांना आपल्या कडील काही पुरावे सादर करावयाचे असेल तर ते त्यांना सादर करता येणार आहे.असेही सांगितले जात आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.