राष्ट्रवादी नाव व घड्याळ पक्षचिन्ह कुणाकडे जाणार? यावर सर्वांचे लक्ष : राष्ट्रवादी कुणाची काकांची की पुतण्याची आज निवडणूक आयोगासमोर दुपारी होणार सुनावणी

पुणे दिनांक ६ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) अजित पवार यांनी ४० आमदार यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर सरकार मध्ये जाऊन सत्तेत सहभागी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर अंत्रर्गत वाद निर्माण झाला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच असा दावा करुन अजित पवार यांनी थेट निवडणूक आयोगात धाव घेतली व तसेच जेष्ठ नेते शरद पवार यांनी सुध्दा निवडणूक आयोगाकडे आपले लेखी उत्तर सादर केले होते.
दरम्यान याप्रकरणी आज शुक्रवार दिनांक ६ ऑक्टोबर पासून या प्रकरणी सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी हे नाव व घड्याळ हे पक्ष चिन्ह आता कुणाला मिळणार? याकडेच सर्व कार्यकर्ते व नेते व अन्य पक्षांचे नेते या सर्वांचे लक्ष लागले आहे.निवडणूक आयोगा पुढे शरद पवार यांच्या गटाच्या वतीने प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ वकील अभिषेक मनू सिंघवी हे तर अजित पवार गटाच्या वतीने नीरज कौल व मणिंदर सिंह हे वकिल बाजू मांडणार आहेत.शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगा समोर ९ हजार प्रतिज्ञापत्रे दाखल केले आहे तर अजित पवार गटाच्या वतीने ६ ते ७ हजार प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यात आले आहे.दरम्यान आज होणाऱ्या सुनावणी मध्ये निर्णय आमच्या बाजूने लागेल असा विश्वास अजित पवार गटाकडून व्यक्त केला जात आहे.तर दुसऱ्या बाजूला निकाल कहीही लागला तरी संभाव्य परिणामांची चिंता करण्याची गरज नाही.अशी आक्रमक भूमिका जेष्ठ नेते शरद पवार यांनी घेतली आहे.काही लोकांचें निवडणूक चिन्ह बदलण्यांचे कारस्थान असू शकते.पण मतदार हे हुशार आहे.निवडणूक चिन्ह बदलले तरी कुठले बटण दाबायचे त्यांना ठाऊक असते असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.