Kasba By- Election : कसबा पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच.! " कसबा गणपती कोणत्या पक्षाला पावणार."

दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या जागांवर निवडणूक आयोगाने आज अचानकपणे पोटनिवडणूक जाहीर केली. दरम्यान कसबा पेठ पोटनिवडणूक काँग्रेस लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुक्ता टिळक यांच्यानिधनानंतर काल निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक जाहीर केली. मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक जाहीर होताच काँग्रेसने निवडणूक लढण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. परपरांगत हा मतदारसंघ काँग्रेसच लढवत आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी असून ही जागा काँग्रेस लढवणार आहे.
दरम्यान कसबा पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसही दोन दिवसात निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. शनिवारी विरोधी पक्षनेते अजित पवार पदाधिकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढायची की नाही याबाबत चर्चा करणार आहेत.
परंपरागत कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेस लढवत आहे. त्यामुळे आघाडी धर्म पाळत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की बिनविरोध करायची यावर चर्चा होणार आहे. काल निवडणूक आयोगाने कसबा विधानसभेची तसेच चिंचवड विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.