Parliament Special Session : मोदी सरकारने बोलावले संसदेचे पाच दिवसांचे विषेश अधिवेशन

पुणे दिनांक ३१ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या अधिच संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे.सदरचे अधिवेशन हे १८ ते २२ सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत होणार आहे.या बाबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवर द्वारे दिली आहे.संसदेचे विषेश अधिवेशन बोलवण्यात आले आहे या सत्रात पाच बैठका घेतल्या जाणार आहेत.
दरम्यान हिवाळी अधिवेशनापूर्वीच मोदी सरकारने पाच दिवसांचे अधिवेशन बोलवल्यामुळे अनेकांचे या अधिवेशनाकडे लक्ष लागले आहे.या अधिवेशनात नेमके कोणते मोठे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचे सूत्रांच्या माध्यमातून समजत आहे.यात एकूण १० विधेयकं मांडली जाणार आहेत.याच बरोबर काही महत्त्वाच्या विधेयकांना मंजूरी देण्याची दाट शक्यता आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.