Politiks : देशामधील रिक्त विधानसभेच्या ७ पोटनिवडणुकींचा कार्यक्रम जाहीर.महाराष्ट्रातील रिक्त दोन लोकसभा निवडणूकींचा यात समावेश नाही

पुणे दिनांक ८ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) देशातील एकूण ७ रिक्त असलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणूकींचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.मात्र या निवडणुका कार्यक्रमात महाराष्ट्रातील दोन लोकसभा रिक्त जागेंचा या पोटनिवडणुकीत समावेश नाही.
दरम्यान आज निवडणूक आयोगाने विधानसभेच्या रिक्त असलेल्या राज्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत झारखंड, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश,व उत्तराखंड,या एकूण ७ विधानसभा मतदारसंघ आहेत.यात याठिकाणी ५ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून ८ सप्टेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रा मधील दोन लोकसभा मतदारसंघ रिक्त असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघ व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ या दोन जागांचा यात समावेश नाही.यामधील पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे ही जागा तर चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे चंद्रपूर लोकसभा अशा एकूण दोन जागा रिक्त आहेत.आज जाहीर करण्यात आलेल्या पोटनिवडणूक कार्यक्रमात पुणे व चंद्रपूर या लोकसभा निवडणूक बाबत यात समावेश नाही.त्यामुळे यादोन पुणे व चंद्रपूर या दोन जागांवर आता निवडणुका होणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.