नागपूरातील हिवाळी अधिवेशन गाजणार : नागपूरात हिवाळी अधिवेशन ७ ते २० डिसेंबर रोजी दहा दिवसांत अधिवेशनाचं कामकाज गुंडाळणार

पुणे दिनांक २१ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुढील महिन्यात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार असून सदरचे अधिवेशन संदर्भात कामकाज बाबत तात्पुरते टाइमटेबल जाहीर झाले असून ऑक्टोबर महिन्यात दिनांक ७ डिसेंबर ते २० डिसेंबर असे हे अधिवेशन केवळ दहा दिवस चालणार आहे. एकंदरीत काय हे अधिवेशन दहा दिवसांत गुंडाळण्याची शक्यता आहे.
दरम्यान या अधिवेशनात अनेक मुद्दे गाजणार आहे.यात प्रामुख्याने मराठा आरक्षण धनगर आरक्षण.सध्या महाराष्ट्रात गाजत असलेले ड्रगसचे प्ररकंरण महाराष्ट्रात असणारी दुष्काळ परिस्थिती.तसेच कायदा सुव्यवस्था व नागपूर मध्ये अतिवृष्टी मुळे व्यापारी व नागरिक यांचे झालेले नुकसान. शेतकऱ्यांना विम्याचे न मिळालेले नुकसान भरपाईचा प्रश्न.असे अनेक प्रश्न या नागपूर मधील हिवाळी अधिवेशनात गाजणार आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.