मराठा आरक्षणावर : ' ...तर बेताल वक्तव्य करणाऱ्या ओबीसी नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही '

पुणे दिनांक ६ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) दोन मराठा समाजात दुही पसरविण्याचे काम व बेताल वक्तव्य करण्याचे काम थांबवले नाही तर त्या नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही.असा स्पष्ट इशारा आता अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी दिला आहे.काही ओबीसी नेते हे जाणून बुजून मराठा- ओबीसी या दोन मराठा समाजात वाद लावण्याचे काम करत आहेत.आमचा कोणाशीही संघर्ष नाही.आम्ही गरीब बांधवांसमावेत आहे.पण नेत्यांनी बोलताना जरा तारतम्य बाळगले पाहिजे.असे ते म्हणाले.
दरम्यान मराठा आरक्षण संदर्भात उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही शेतकरी वर्गात मोडत आहे.त्यामुळे पूर्वी निजामशाही कालाखंडात शेतकरी हे कुणबी समाजात मोडतात म्हणून त्यांना आरक्षण होते. व त्याच प्रमाणे आम्हाला आरक्षण द्यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाला केली व त्यानंतर तशी कारवाई देखील राज्य सरकारच्या वतीने चालू झाली.व आज हैद्राबाद संस्थान येथे राज्य सरकारच्या वतीने कागद पत्रांची पाहणी करता शिष्टमंडळ गेले आहे.पण या सर्व घडामोडी घडत असताना काही ओबीसी नेत्यांच्या पोटात पोटशूळ उठलं असून ते आता यादोन्ही समाजात बेताल वक्तव्य करुन तेढ निर्माण करण्यांचा प्रर्यत्न करीत आहे.त्यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.