आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षण बाबत अध्यादेश निर्णय होऊ शकतो : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणावर अध्यादेश येण्याची शक्यता.विषेशअधिवेशन होणार आहे

पुणे दिनांक ३१ ऑक्टोबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज मंत्रिमंडळाची बैठक दुपारी होत असून या बैठकीत मराठा आरक्षण बाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय होऊ शकतो.एक ते दोन दिवसांत विधीिमंडळाचे विषेश अधिवेशन बोलावून त्यात अध्यादेशाला मंजुरी घेतली जावू शकते.आज दुपारी १२ वाजता मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे.तसेच या बाबत भाजपचे सर्व आमदार यांची चर्चा बंद दाराआड झाल्या बाबत सूत्रांकडून समजतं
दरम्यान एका मराठी वृत्तपत्रांनी म्हटले आहे की.विधीमंडाचे विषेश अधिवेशन घेऊन त्यात मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेण्याच्या मुद्द्यावरून सरकार मधील तिन्ही पक्षाचं एकमत झाले असून.काल मध्यरात्री याच मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने राज्यपाल यांच्याशी चर्चा केल्यांची माहिती समोर येत आहे.व त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे.व मंत्रीमंडळांच्या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढून नंतर दोन दिवसांचे विषेश अधिवेशन बोलावून त्यात हा अध्यादेशाला मंजुरी घेतली जाण्याची दाट शक्यता आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.