पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन : आज एकाच वेळी नऊ वंदे भारत रेल्वे ट्रेन सुरु होणार ११ राज्यात धार्मिक स्थळे व प्रर्यटन स्थळे जोडणार

पुणे दिनांक २४ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज २४ सप्टेंबर रोजी एकाच वेळी देशवासीयांना नऊ वंदे भारत रेल्वे ट्रेन सुरु करणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण मध्य रेल्वेच्या SCR दोन सेवासह नऊ वंदे भारत रेल्वे ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.हे नऊ ट्रेन एकूण ११ राज्यातील धार्मिक व पर्यटन स्थळे जोडणार आहेत.
दरम्यान आज व्हिडिओ काॅन्फरन्सिंग द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी काचीगुडा यशवंतपूर - विजयवाडा.MGR चेन्नई सेंट्रल मार्गा दरम्यान वंदे भारत रेल्वे ट्रेनचे उद्घाटन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमात रेल्वे मंत्री अश्र्विनी वैष्णव सहभागी होणार आहेत.काचीगुंडा यशवंतपूर दरम्यानची वंदे भारत रेल्वे ट्रेन सेवा या मार्गावरील इतर ट्रेनच्या तुलनेत सर्वात कमी प्रवास वेळे सह दोन शहरांमधील सर्वात वेगवान ट्रेन असेल यामध्ये एकूण ५३० प्रवासी बसण्याची असन क्षमता असणार आहे.विजयवाडा - एमजीआर चेन्नई सेंट्रल मार्गावरील ही सर्वात वेगवान ट्रेन असेल तसेच पश्चिम बंगाल मार्गावरील हावडा कोलकाता या दोन जुळ्या शहरादरम्यान आणखी दोन वंदे भारत रेल्वे ट्रेन मिळतील.
दरम्यान पाटना - झाझा.आसनसोल बर्दवान.हावडा या मुख्य मार्गावरील रेल्वे ट्रॅक मजबूत करण्याबरोबरच पाटणा- हावडा मार्गावर सेमी-हाय- स्पीड ट्रेन चालविण्याची तयारी रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत रेल्वे ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी I C F येथे निर्मित ट्रेन सेट ' मेक- इन- इंडिया ' उपक्रमांचे प्रतीक आहे रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते पाटणा-हावडा व रांची- हावडा मार्गासाठी नवीन रेक मध्ये २५ अतिरिक्त वैशिष्ट्ये असतील.तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या नऊ रेल्वे ट्रेन या ११ राज्यातील धार्मिक व पर्यटन स्थळाशी जोडल्या जाणार आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.