Central election commission : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गट उच्च न्यायालयात

शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह बदलण्याचा निर्णय अत्यंत घाई गडबडीत घेऊन सदरचे चिन्ह गोठविण्यात आले आहे. तसेच आम्हाला आमचे म्हणणे व बाजू मांडण्यासाठी संधी दिली नाही. अशी तक्रार करीत ठाकरे गटांनी निवडणूक आयोगाच्या विरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
" शिवसेना कोणाची? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने कागदपत्र सादर करण्याची विनंती केली होती. व त्यानुसार आम्ही सर्व कागदपत्राची पूर्तता केली. त्यानंतर सुनावणी घेऊन आयोगाने यावर दोन्ही गटाचे काय म्हणणे आहे. हे ऐकून घेणे अपेक्षित होते. मात्र तसे काही न करता फक्त अंधेरी पोटनिवडणुकीचा हवाला देऊन तातडीने चिन्ह गोठविण्यात आले. अंधेरी पोट निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी अजून बराचसा वेळ आहे. तोपर्यंत आयोगाला सुनावणी घेता आली असती" अशी याचिका ठाकरे गटाच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आले आहे.
दरम्यान या सर्व घडामोडी बाबत केंद्रीय निवडणूक आयोग दुपारपर्यंत उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटाला कोणते पक्ष चिन्ह व नाव देण्याचा निर्णय घेणार आहे. या सर्व गोष्टींच्यामुळे आयोगाने आमच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी यावेळी दिली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.