शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी ऊध्दव ठाकरे यांना काळे झेंडे दाखवले : उध्दव ठाकरे शाखा स्थानकाजवळ पोहोचले आहेत पण त्यांना शाखे प्रर्यत जाऊ दिले नाही

पुणे दिनांक ११नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) ठाण्यातील मुंब्र्यातील २१ वर्षांपूर्वीची शाखा शिंदे गटाने बुलडोझरच्या सह्हयाने पाडून त्या ठिकाणी कंटेनर मध्ये शाखा सुरू करण्यात आली आहे.त्या ठिकाणी पाडलेल्या शाखेची पाहणी करण्यासाठी गेले आहेत.पण पोलिसांनी त्याठिकाणी बॅरिकेडिंग केले आहे.व त्याठिकाणी शिंदे गटाच्या वतीने या शाखेला मोठ्या प्रमाणावर घेराव घातला आहे.तर पोलिसांनी त्या ठिकाणी ऊध्दव ठाकरे यांना जाण्यास मज्जाव केला आहे.त्यामुळे वातावरण चांगलेच पेटले आहे.तर उध्वव ठाकरे व शिवसैनिक त्या ठिकाणी जाण्यास निघाले आहेत.पण पोलिस त्यांना जाऊ नये म्हणून आग्रही आहेत.दरम्यान या ठिकाणी ऊध्दव ठाकरे यांना शिंदे गटाच्या वतीने यावेळी काळे झेंडे दाखवण्यात आले आहे.
दरम्यान उध्वव ठाकरे यांनी हे बॅरिकेडिंग काढून टाका व सदरची शाखा तोडताना परवानगी घेतली का.त्याठिकाणी कंटेनर टाकण्याकरीता पोलिसांची परवानगी घेतली का.? अशी विचारणा करण्यात आली.दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा पोलिसांनी प्रश्न उपस्थित करुन त्यांना शाखे प्रर्यत जाऊ दिले नाही.उध्दव ठाकरे यांनी चालत जाऊन बॅरिकेडिंग पसूनच पाहाणी केली.व आता त्यांचा ताफा पुन्हा आता ठाण्याच्या दिशेने गेला आहे.ते आता ठाण्यात थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.