हिंगोली उध्दव ठाकरे यांची सभा : उद्धव ठाकरे यांनी भाजपावर साधला हिंगोली मधून निशाना, आता भाजपमध्ये सगळे आयाराम...

पुणे दिनांक २७ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्र मध्ये भाजपाचे सरकार आले परंतु निष्ठावंत कार्यकर्ते यांना काहीच मिळाले नाही.शिवसेना फोडल्यानंतर डबल इंजिन सरकारमध्ये आणखीन एक डबा अजित पवार यांचा जोडला आहे.यामळे खरा अन्याय निष्ठावंत कार्यकर्ते यांच्यावर होत आहे. शिवसेना नेते उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची जाहीर सभा रविवारी २७ ऑगस्ट रोजी हिंगोली येथे झाली.यावेळी ते बोलत होते.यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला व भाजपच्या राजकारणावर जोरदार टीका केली.यावेळी त्यांनी भाजप पक्ष वाढवणाऱ्या कार्यक्रर्तेनची आज काय परिस्थिती झाली आहे.हे सांगून भाजपला आरसा दाखविण्याचा प्रयत्न केला.तसेच शिवसेना मधील गद्दारांवर टीका केली.उद्धव ठाकरे यांनी यावेळी संपूर्ण भाषणात भाजप व पंतप्रधान मोदी यांनाच केंद्रीत केले होते.
दरम्यान बोलताना ते पुढे म्हणाले की शिवसेना २५ ते ३० वर्षे भाजप बरोबर होते.त्यावेळी आमच्या सोबत भाजपचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आज आम्हाला किव वाटते.या कार्यकर्तेनी भाजप साठी आपले आयुष्य झिजवले.त्यांनी मेहनत करून भाजप हा पक्ष मोठा केला.परंतु तेच कार्यक्रर्ते आज उपाशी राहिले असून तूपाशी मात्र आयाराम झाले आहेत.यासाठी तुम्ही मेहनत घेतली होती का.? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी त्या निष्ठावंत कार्यकर्ते यांना विचारला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.