उध्दव ठाकरे यांना महानगरपालिकेच्या वतीने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी : दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच उध्दव ठाकरे यांचीच तोफ धडाडणार महापालिकेची परवानगी

पुणे दिनांक १२ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रा मधील तमाम शिवसैनिकांचे लक्ष लागले होते की दसरा मेळाव्यासाठी मुंबई महानगरपालिका कोणाला परवानगी देणार पण त्यांची उत्कृस्ता आज संपली असून दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उध्दव ठाकरे यांना परवानगी दिली आहे.आता २४ ऑक्टोबरला शिवाजी पार्कच्या मैदानावर उध्दव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.
दरम्यान २४ ऑक्टोबर रोजी दादरच्या शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी उध्दव ठाकरे यांच्यावतिीने मुंबई महानगरपालिकाकडे अर्ज करण्यात आला होता.तर याच पार्कवर मेळावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीने देखील अर्ज केला होता.मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीने अर्ज मागे घेण्यात आला आहे.त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने उध्दव ठाकरे यांच्या गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे.दरम्यान आता या होणाऱ्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे हे काय बोलणार याकडे तमाम शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.