Supreme court shivsena : मंगळवारी नेमका सूप्रिम कोर्टात काय होणार : शिवसेना आमदार

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर 10 जानेवारीला सर्वोच्च न्यायालायत सुनावणी होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी होणार आहे.
या सुनावणीचे वेळापत्रक 10 जानेवारीला ठरण्याची शक्यता आहे. शिवाय सर्व पक्षकारांना लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार ठाकरे गट , शिंदे गट आपली बाजू मांडणार आहेत. तर निवडणूक आयोगात शिवसेनेचं निवडणूक चिन्हं धनुष्यबाण दोनही गटापैकी कोणाला मिळणार या संदर्भात पहिल्यांदाच देशाच्या निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी पार पडणार आहे.
उद्या होणाऱ्या सुनावणीत दोन्ही गटाने जे कागदपत्र सादर केले आहेत त्यावर शंका घेणारे अर्ज सादर करण्यात आले आहेत. त्यावर उद्या अगोदर सुनावणी होणार आहे. आणि नंतर मूळ प्रकरणावर सुनावणी घ्यावी अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी करणारे न्यायाधीश
1. न्यायमूर्तीं धनंजय चंद्रचूड
2.न्यायमूर्तीं एम आर शहा
3.न्यायमूर्तीं कृष्ण मुरारी
4.न्यायमूर्तीं हिमाकोहली
5. न्यायमूर्तीं पी नरसिंहा यांचा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे ही सुनावणी सुरू आहे.
आत्तापर्यंत कोणी किती कागदपत्र सादर केली?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
182 राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य
प्रतिज्ञापत्र 3 लाख (जिल्हा प्रमुख ते गटप्रमुख)
प्राथमिक सदस्य 20 लाख
एकूण कागदपत्र 23 लाख 182
बाळासाहेबांची शिवसेना
खासदार 13
आमदार 40
संघटनात्मक प्रतिनिधी 711
स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी-2046
प्राथमिक सदस्य 4,48,318
शिवसेना राज्यप्रमुख 11
एकूण 4 लाख 51 हजार 139
16 आमदारांवर सुप्रीम सुनावणी
मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुनावणी होणार आहे. या सुनावणीत 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पाठवलेल्या नोटीसबाबत सुप्रीम कोर्टात काय निर्णय होणार, यावर महाराष्ट्राचं राजकारण अवलंबून असणार आहे, त्यामुळे उद्याचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचा मानला जातोय
कोणत्या 16 आमदारांना नोटीस मिळाल्या जाणून घ्या.
महाराष्ट्रामध्ये जून महिन्यात सत्तानाट्य सुरू असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी गुवाहाटीला गेलेल्या 16 आमदारांना तुमच्यावर कारवाई का करू नये? याबाबत 48 तासात उत्तर द्यायची नोटीस पाठवली होती. या 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले. संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोराने आणि चिमणराव पाटील या 16 आमदारांना ही नोटीस पाठवण्यात आली होती.
आमदारांना नोटीस पाठवण्यात आल्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. विधानसभा उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव आला असल्यामुळे ते आम्हाला अशी नोटीस पाठवू शकत नाहीत, असा दावा शिंदे गटातल्या आमदारांनी केला, यानंतर सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या निलंबनाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश दिले होते. या प्रकरणी आता मंगळवारी उद्या सुनावणी होणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.