विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं राज्य सरकारला टोला : दिल्ली मधील मोठ्या नेत्याला खूष करण्यासाठी ४० कोटींचा खर्च का?

पुणे दिनांक ७ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे अमृत महोत्सव वर्ष असून याबाबत दिनांक १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर मध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून यासाठी राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणावर ४० कोटींचा निधी दिला आहे.या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार असल्याने प्रशासनाच्या वतीने जोरात तयारी सुरू आहे मराठावाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमा साठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च केला जात असल्याची टीका आता विरोधकांच्या कडून होत आहे.
दरम्यान एका वृत्ताचा हवाला देत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी अनावश्यक रोषणाई व मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकार तब्बल ४० कोटी रुपयांचा मोठा खर्च करणार आहे.मिंधे गटाचे दिल्ली मधील मोठे नेते या कार्यक्रमाला येणार असून त्यासाठी हा खर्च केला जात आहे का ? असा सवाल अंबादास दानवे यांनी ट्टिटच्या माध्यमातून केला आहे.
दरम्यान त्यांना खूष करण्यासाठी केवढा हा आटापिटा .याच महाराष्ट्रद्रोही गुहस्थाने राज्याच्या राजकारणाची हास्य जत्रा केली आहे.तरीही यांच्या मनोरंजनासाठी लोकांचे पैसे वायफळ खर्च केले जात आहेत.यापेक्षा मराठावाड्यात दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीबाबत काहीतरी उपाययोजना करा, असा टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.