बारामतीत गोंविद बागेत 'पाडवा पहाट' : आज पाडव्याच्या निमित्ताने गोंविद बागेत शरद पवार व अजित पवार एकत्र येणार का ?

पुणे दिनांक १४ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज दिवाळीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे.अनेक ठिक ठिकाणी ' पाडवा पहाट ' उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत.आज बारामतीतील गोंविद बागेत देखील पवार कुंटुबियाच्या वतीने अनेक वर्षांपासून दिवाळी पाडव्याचे आयोजन करण्यात येते.आज देखील आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व सामान्य नागरिक हितचिंतक हे मोठ्या प्रमाणावर पवार कुंटुबियाच्या वतीने दिवाळीच्या शुभेच्छाचा स्वीकार करतात.दरम्यान मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर फूट पडली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे गोंविद बागेत कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार का? याची उत्सुकता सर्वच बारामतीकरांना लागली आहे.
दरम्यान आज बारामती येथील गोंविद बागेत दिवाळी पाडवा पहाट हा कार्यक्रम सकाळीच सुरू झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.पवार कुंटुबियाकडून सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे दिवाळी च्या पाडव्याच्या शुभेच्छा स्वीकारल्या जात आहे.दरम्यान यापूर्वी पुण्यातील प्रताप पवार यांच्या घरी संपूर्ण पवार कुंटुबियांचा स्नेह भोजन कार्यक्रम झाला होता.त्यावेळी अजित पवार हे उपस्थित होते.त्या नंतर पुन्हा बारामती येथे प्रतापराव पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाला आहे.यात संपूर्ण कुटुंब एकत्र आले होते.पंरतू अजित पवार हे उपस्थित नव्हते.पण त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या स्नेह भोजनाला उपस्थित होत्या.दरम्यान या स्नेह भोजनाचा फोटो इन्सटावर शेअर केला आहे.दरम्यान आज दिवाळी पाडव्याच्या निमित्त गोंविद बागेत अनेक कार्यकर्ते उपस्थित झाले असून या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की.मागील ६५ वर्षांपासून दिवाळी निमित्त पाडवा पहाट कार्यक्रम शरद पवार यांनी सुरू केला आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना अजित पवार यांच्या उपस्थितीबाबत विचारले असता त्यांनी यावेळी सांगितले की अजित पवार यांना डेंग्यू झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी आराम करण्यासाठी सांगितले आहे.त्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत .तर रोहित पवार हे बीड मध्ये शेतकरी वर्गाचे अवकाळी पाऊसामुळे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे.तसेच संपूर् महाराष्ट्रात बेरजगारी व महााई वाढली आहे करिता त्यांनी संघर्ष यात्रा काढली असून ते बीड मध्ये आहेत.यावेळी गोंविद बागेत आलेल्या एका कार्यकर्त्याने सांगितले की मी पवार यांना पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळी सहा वाजता घरुन निघालो आहे.व पवार कुंटुबियाना शुभेच्छा दिल्या नंतरच दिवाळी खऱ्या अर्थाने झाली असं वाटतं व मी दरवर्षी दिवाळी मध्ये पाडव्याला शुभेच्छा देण्यासाठी येतो असे सांगितले आहे. दरम्यान आजचा दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते हजेरी लावली आहे.यावेळी पवार साहेब यांना भेटल्यावर आम्ही आमच्या विठ्ठलला भेटल्या सारखं वाटतं असे अनेक कार्यकर्ते यावेळी सांगत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.