नागपूर अधिवेशनात दुसऱ्या दिवशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मांडणार मराठा आरक्षणाचा मुद्दा : मराठा आरक्षणाचा आवाज हिवाळी अधिवेशनात नागपूरच्या गुलाबी थंडीत घुमणार व वातावरण होणार गरम?

पुणे दिनांक १६नोंव्हेबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण महाराष्ट्रातून आता मराठा कुणबी व कुणबी मराठा नोंदी मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत.या वरुन सिद्ध होत आहे की मागील काळातील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी फक्त मराठा समाजाचा वापर हा मतदाना पुरताच केला आहे.व त्यांच्या वाट्याचे हक्काचे आरक्षण इतर समाजाच्या पारड्यात टाकून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचा शैक्षणिक व आर्थिक नौकरी यात मराठा समाजावर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला आहे.आता मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्रातून एकटावला आहे.त्यामुळे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरची डेडलाईन दिली आहे.दरम्यान ७ डिसेंबर पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.व अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरक्षणांच्या मुद्द्यांवर बोलणार आहेत.
दरम्यान राज्य सरकारच्या वतीने कायदेशीररीत्या आरक्षण बाबत अभ्यास करत आहे.व राज्य सरकारच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या कुणबीच्या नोंदी शोंधण्याचे काम प्रशासन पातळीवर युद्ध स्तारावर सुरू आहे.व नोंदी देखील सापडत असून मराठा समाजाच्या अशा देखील पल्लवित झाल्या आहेत.तर दुसरीकडे मराठे समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की"सरकारच्या छाताडावर बसून २४ डिसेंबर पर्यंत आरक्षण घेणार असा निर्धार जरांगे पाटील यांनी केला आहे." याप्रकरणी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रात पेटला आहे . त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी.मुंबई येथील दसरा मेळावा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार अशी घोषणा केली होती.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या अपेक्षा देखील उंचावल्या होत्या. दरम्यान आता या सर्व पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनात या बाबत एक दिवसाचा राखीव कालावधी ठेवण्यात आला आहे.तसेच नागपूर मधील हिवाळी अधिवेशनाची अधिसूची देखील जारी करण्यात आली आहे.दरम्यान या सर्व घडामोडी नंतर ८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपली भूमिका स्पष्ट करतील.याच अधिवेशनात मराठा आरक्षण संदर्भात म्हत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.दरम्याण नागपूर मधील हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.दरम्यान नागपूर येथील गुलाबी थंडीत विधीमंडळाचे वातावरण नक्कीच तापणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.