Soshal : अमरनाथ यात्रेला अहमदनगर जिल्ह्यातून गेलेले १००.भाविक अडकले

पुणे दिनांक १२ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) अमरनाथ यात्रेला अहमदनगर जिल्ह्यातून एकूण १००.भाविक गेले होते. हे सर्वजण भाविक हे आता तिथेच अडकून पडले आहेत. जम्मू - श्रीनगरमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळत आहे. या पाऊसा मुळे आलेल्या मोठ्या महापूरात महामार्गावरील पुल कोसळून सदरचा पुल वाहून गेला आहे. सदरचा पुल कोसळल्याने या भागातील वाहतूक यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. त्या मुळे अमरनाथ यात्रा ही सध्दे परीस्थितीत थांबविली आहे. त्या मुळे ४ दिवसा पासून हे सर्वे भाविक अंनतनाग येथील लष्कराच्या छावणीत मुक्कामी आहेत. हे सर्व भाविक अहमदनगर जिल्ह्यातील असून अहमदनगर जिल्हा प्रशासन या भाविकांच्या संपर्कात आहे. यातील सर्व भाविक हे सुखरूप आहेत. अशी माहीती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. चालू वर्षांत अमरनाथ यात्रा ही १ जुलै पसून चालू झाली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.