श्रावणमास पहिला सोमवार : पहिला श्रावण सोमवार शिवमंदिर मध्ये भावीकांची दर्शनासाठी गर्दी

पुणे दिनांक २१ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) अधिकमास महिना संपला आहे व आता श्रावणमाचा महिना सुरू झाला आहे.आज संपूर्ण महाराष्ट्रात शिवमंदिरात भाविकांची प्रचंड अशी गर्दी झालेली आहे.भावीक पहाटे पासून शिवमंदिरात विधीवत पूजा व दर्शनासाठी दाखल झाले आहेत.
दरम्यान महाराष्ट्राती पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर व नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मंदिर तसेच स्थानिक पातळीवर असलेल्या शिवमंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.असे एकंदरीत आज पहाटे पासून चे चित्र आहे.भावीक दही दुध च्या सहाय्याने शिवपिंडी वर अर्पण करून द्रर्शन घेत आहेत.तर या श्रावण महिन्यात शिवपिंडीला अभिषेक करण्याचं महात्म्य असते व शुभकारक मानलं जातं त्यामुळे पुरोहितांनच्या हस्ते अनेक भाविक हे अभिषेक देखील आजच्या दिवशी करतात.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.