Soshal. : आषाढी वारी साठी पंढरपूरात दाखल होणार २०.लाख वारकरी! वारकऱ्यांचा बंदोबस्ता साठी पोलीस यंत्रणा अलर्ट. ६ हजार पोलीसांचा बंदोबस्त.

पुणे.दिनांक २० ( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम )पंढरीच्या लाडक्या पांडुरंगाच्या भेटी आषाढी वारी आवघया म्हणजेच जेमतेम एक आठवड्याच्या कालावधीवर आली आहे.या वर्षी अंदाजे २०.लाख वारकरी पंढरपूरात दाखल होण्यची शक्यता आहे. असे एकंदरीत पोलीस प्रशासनांचे म्हणने आहे. या करीता महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ व रेल्वे प्रशासनाकडून संपूर्ण भारतातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयी करीता सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
दरम्यान येणाऱ्या २९.जूनला आषाढी वारी सोहळा असून दरवर्षी महाराष्ट्र. व कर्नाटक व इतर राज्यांतून दरसालबाद प्रमाने पंढरीच्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनास अंदाजे २०.लाख वारकरी पंढरपूरात मोठ्या संख्येने येत असतात. या करीता पोलीस यंत्रणा. महसूल यंत्रणा. राज्य महीला आयोग तसेच आर टी ओ. विभाग. व सामाजिक संघटना. यांच्या वतीने वारकऱ्यांच्या अडी आडचणी वर मात केली जाते. तसेच दरसाल प्रमाने. राज्य परिवहन मंडळ. व रेल्वे.प्रशासन. यांच्या वतीने.देखील वारकऱ्यांच्या सोयी साठी जादा बसेस व रेल्वेची व्यवस्था केली जाते.
राज्य शासनाकडून काही दिवसांपासून महिला वर्गा करीता एस टी मध्ये प्रवासात ५०%.सवलत टिकीटाची व्यवस्था केली असून त्या मुळे आता असंख्य महिल वारकरी पंढरपूरात दाखल होणार आहेत. तसेच ६५.वर्षा वरील जेष्ठ नागरिकांन साठी आधार कार्ड. व मतदान कार्ड दाखवून एसटीत सवलतीचा लाभ घेता येणार आहे.एसटी प्रशासनांने प्रवासा साठी. १८००२२१२५०.हा टोल फ्री क्रमांक हेल्पलाईन नंबर आहे या नंबर द्वारे वारकऱ्यांना एस टीचे वेळापत्रक समजणार आहे. असे राज्य परिवहन विभागाच्या वतीनेच सांगण्यात आले आहे.आषाढी वारी साठी येणाऱ्या वारकरी यांच्या बंदोबस्ता साठी एकूण ६.हजारांहून पोलीस बंदोबस्त राहणार असून इतर जिल्ह्यातून बंदोबस्ता साठी पोलीस पंढरपूरात दाखल झाले आहेत. तसेच १ हजारांहून जास्त होमगार्ड पोलिसांच्य मदतीला आसणार आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.