Vijay Bhosle : पोलखोल नामा च्या वतीने पत्रकार विजय भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे आज पिंपरी चिंचवड येथे हद्यविकाराने निधन झाले.धाडसी पत्रकार म्हणून ते ओळखले जात. ‘केसरी’ साठी त्यांनी विविध पदांवर काम पाहिले. त्यांनी दीर्घकाळ पिंपरी चिंचवड मध्ये वार्तांकन केले. विधीमंडळाच्या अधिवेशनांचेही त्यांनी उत्तम वार्तांकन केले होते.
परवा भोसरी इंद्रायणी नगर येथे हॉस्पिटलच उदघाटन शरद पवार यांच्या हस्ते पार पडले.
विजय भोसले साहेब यांची तबियत बरोबर नव्हती. त्यामुळे सुरुवातीला हॉस्पिटल च्या कार्यक्रमास जाण्याचे त्यांनी टाळले होते.
तसा त्यांनी निरोप ही अनेकांना दिला होता.
मात्र शरद पवार येणार आहेत आणि आपण तिथे नसणार, शरद पवार नेमके काय बोलणार ? हे आपणास समजणार नाही, बातमी व्यवस्थित करता येणार नाही असे वाटल्याने आजारी असतानाही भोसले साहेब केवळ बातमीची "ओढ" असल्याने उदघाट्नास आले आणि कार्यक्रम संपताच घरी निघताना उदघाटन झालेल्या हॉस्पिटलच्या इमारती मध्येच त्यांची परस्थिती बिघडली.
तीन तासाच्या उपचारानंतर त्यांना त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन त्याच रात्री यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रुबी केअर मध्ये त्यांना ऍडमिट केले होते. व तेथेच त्यांच्यावर उपचार सुरु होते आणि आज त्यांची सकाळी 11.30 वाजता प्राणज्योत मावळली !
त्यांच्या आकस्मिक निधनाने पत्रकारिता क्षेत्राला धक्का बसला.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.