Journalist : पत्रकारांना धमकी देणाऱ्यास ५० हजार रूपायांचा दंड व तीन वर्षाचा कारावास

हायकोर्टाच्या टिके नंतर पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी जाहीर केले आहे की पत्रकारांशी असभ्यवर्तन करणाऱ्यास ५० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. तसेच पत्रकारांशी गैरवर्तन केल्यास तीन वर्षाचा कारावास देखील होऊ शकतो. पत्रकाराला धमकी देणाऱ्याला थेट तुरुंगात पाठविले जाईल तसेच या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला सहजासहजी जामीन देखील मिळणार नाही.
दरम्यान पुढे बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की या संदर्भात पत्रकार अडचणीत आल्यावर त्वरित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व अधिकाऱ्यांनी देखील पत्रकाराला त्वरित मदत करावी. पत्रकारांशी आदाराने बोलावं नाहीतर याची तुम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. या सर्व बाबतीत पत्रकारांची गैरवर्तन केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर एफ आय आर नोंदविला जाईल. किंवा एस पीं न वर कारवाई केली जाईल.
कोणत्याही ठिकाणी हाणामारी व गदारोळ झाल्यास पोलीस पत्रकारांना रोखू शकत नाही व त्याच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाही. जशी बघ्यांची गर्दी हाटवितात तशी हिन वागणूक पत्रकारांना देऊ शकत नाही. तसे केल्यास पोलीस व अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. पत्रकारांवर असा प्रकार केल्यास पत्रकारांना रोखणे म्हणजे माध्यमांवर गदा आणली असे होईल. याबाबत केंद्रीय प्रेस कॉउंसिल कॅबिनेटचे मुख्य सचिव सर्व राज्यांचे गृहसचिव व मुख्य सचिव यांना अशा सूचना देण्यात आले आहेत. पत्रकारांवर असे कोणताही प्रकार होणार नाही याची सर्वस्व जबाबदारी व काळजी सरकारने घ्यावी असेही ते यावेळी म्हणाले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.