Crishtian prostest : अन्याय - अत्याचाराचा निषेधार्थ ख्रिस्ती समाजाचा भव्य मूक महामोर्चा

सध्या देशभरात ख्रिस्ती समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत ,चर्च वर हल्ले होत आहेत असा दावा करुन निषेध करण्यासाठी पुणे शहर ,पिंपरी चिंचवड ,ग्रामीण भागातील ख्रिस्ती समाज आज रस्तावर उतरला होता. मूक महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .या मोर्चात सर्व ख्रिस्ती पंथ कॅथोलीक, प्रॉटेस्टंट ,सी.एन.आय ,मेथडिस्ट सह सर्व पंथ सहभागी झाले होते.
मोर्चाची सुरुवात सिटी चर्च नानापेठ पासून संविधनाच्या उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आली, त्याचबरोबर या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना ख्रिस्ती समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या मोर्चात वंचित बहुजन आघाडीच्या अंजली प्रकाश आंबेडकर ,धर्मगुरू निकाळजे ,काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे ,माजी आमदार मोहन जोशी ,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, आम आदमी चे अभिजित मोरे रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे,माजी नगरसेविका अश्विनी लांडगे ,भीम आर्मी प्रदेशाध्यक्ष दत्ता पोळ,अंजुम इनामदार, मोर्चाचे समन्वयक प्रशांत केदारी आणि सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली या मोर्चात प्रामुख्याने फादर मालकम, बिशप अंडरयू राठोड, बिशप चांदेकर, पास्टर रॉबिन महाडकर, फादर रोक्सी, पास्टर फेलोशिप संघ, सर्व सिस्टर्स, सर्व ख्रिस्ती बांधव, सर्व संघटना प दाधिकारी, , सर्व ख्रिस्ती संघटना यांनी पाठिंबा दिला. यासह पुणे शहरातील विविध पक्ष ,संघटना ,ख्रिस्ती पंथ ,संघटना व नागरिक हजोरींच्या संख्येने उपस्थित होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.