१ लाख ५ हजार लिटर मोहरीच्या तेलाचा वापर : अयोध्यात सरयू नदीच्या ५१ घाटांवर २४ लाख दिवे प्रज्वलित गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला

पुणे दिनांक १२नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) अयोध्या मध्ये सातवा दीपोत्सवा निमित्ताचे औचित्य साधून सरयू नदीच्या काठावरील ५१ घाटांवर २४ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले आहे.व गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला गेला आहे.हे प्रज्वलित करण्यात आलेले दिवे मोजण्यासाठी एकूण आठ ड्रोनच्या वापर करून हे दिवे मोजण्यात आले आहे.हे दिवे प्रज्वलित करण्यासाठी तब्बल १लाख ५ हजार रुपयांचे मोहरीच्या तेलाचा वापर करण्यात आला आहे.यापर्वी सरयू नदीच्या काठावर १५ लाख ७६ हजार दिवे लावण्याचा विक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे.
दरम्यान सकाळी श्रीरामांचे अयोध्येात आगमनाचे प्रतिक असलेली भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.महर्षी वाल्मिकी यांनी होलोग्राफिक प्रकाशद्वारे श्रीरामाची कथा सांगण्यात आली.नंतर लेक्षरशो नंतर २३ मिनिटे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.एकूण ८४ लाख रुपयांचे हरीत फटाके यावेळी जाळण्यात आले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.