Solution for traffic jam problem in Pune : पुण्यातल्या वाहतूक कोंडीच्या समस्यावर लवकरच तोडगा

पुणे शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असताना ही समस्या सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून साधारणतः २१ ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, ग्रेड सेपरेटर,नदी व लोहमार्गावर पूल बांधण्यासाठी चाचपणी करण्यात येत आहे.त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. शहरातील वाहतुकीवर उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने 2000 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून सध्या सुरू असलेल्या कामांसोबत 21 ठिकाणी हा निधी प्रस्तावित करण्यात येणार आहे. अडथळे कमी असणाऱ्या पंधरा ठिकाणी कामे करण्याचा विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले.
संभाव्य कामे खालील प्रमाणे
मुंढवा ताडीगुत्ता चौक ते वडगाव शेरी नदीवरील पूल , कोरेगाव पार्क कल्याणी नगरला जोडणारा पूल, पानमळा येथून कर्वे रस्ता व सिंहगड रस्त्याला जोडणारा पूल , पुणे स्टेशन व संगमवाडीला जोडणारा लुंबिनी नगर येथील पुल, संगमवाडी येथील बिंदू माधव ठाकरे चौकात ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल, येरवडा येथील आंबेडकर चौकात ग्रेड सेपरेटर ,उड्डाणपूल *विश्रांतवाडी चौकात ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल *सोलापूर रस्त्यावरील काळुबाई चौकात ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल *सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा जवळील चौकात ग्रेड सेपरेटर *हरे कृष्ण मंदिर येथे ग्रेड सेपरेटर,शिवाजीनगर चौक येथील चौकात ग्रेड सेपरेटर, मुंढवा चौक येथे उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर *दांडेकर पूल येथे ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल **लोहमार्गावरील उड्डाणपूल ** *घोरपडी - साधू वासवानी पूल, कोरेगाव पार्क -ससाणे नगर येथे उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर,फुरसुंगी चौक
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.