Constitution day : संविधान दिनानिमित्त उपक्रम पर्यटन विभागाकडून ३ डिसेंबरसह तीन दिवस मोफत सहल, बससेवा

संविधान दिनाचे औचित्य साधून पर्यटन विभागाकडून उद्या ३ डिसेंबर सह ७ व ८ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्कीट टूर आयोजन करण्यात येणार आहे. याअंतर्गत पर्यटन संचालनालयाच्या पुणे विभागीय पर्यटन कार्यालयाकडून मोफत सहल, बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या टूर सर्किटमध्ये सिम्बॉयसिस महविद्यालय येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्युझियम व मेमोरियल, आगाखान पॅलेस आणि तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान या स्थळांचा समावेश आहे.
या सहलीत सहभागी होणारे पर्यटक, नागरिकांना पर्यटन विभागामार्फत गाईड, चहा व अल्पोपाहार या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी ऑपरेशनल एक्झेक्युटिव्ह अजयकुमार कुलकर्णी- भ्रमणध्वनी क्र. 8080035134 यांच्याशी संपर्क साधावा. या मोफत सहलीचा लाभ घेण्याचे आवाहन विभागीय पर्यटन कार्यालयाच्या सहायक संचालक श्रीमती सुप्रिया करमरकर- दातार यांनी केले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.