Soshal : अदनान सामी यांना भारताचं नागरिकत्व मिळू शकतं.तर...? सीमा हैदरने राष्ट्रपतींकडे मागितली आता थेट दाद

पुणे दिनांक २३( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)मागील काही दिवसांपासून पाकिस्तान मधून नेपाळ मार्गे भारतात आलेल्या सीमा हैदर व सचिन मीणा या दोंघाच्या प्रेम प्रकरणामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.सीमाने नेपाळ मार्गे सीमा ओंलडून भारतात तिने प्रवेश तर तिने केला पण ती आता वादाच्या भोव-यात अडकली आहे.हेरागिरीच्या आरोपांनी वेढलेल्या पाकिस्तानी सीमा हैदरला आता भारताचं नागरिकत्व पाहीजे आहे त्यासाठी तिने आता थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दाद मागितली आहे.सीमाच्या वतीने ॲड एपी सिंग यांच्या मार्फत राष्ट्रपती भवनाकडे याचिका दाखल केली आहे. व भारताचं नागरिकत्व मिळविण्यासाठी पाकिस्तानी वंशाचे प्रसिद्ध गायक अदनान सामी यांचा हवाला दिला आहे.
दरम्यान सीमा हिने ' मी सीमा हैदर नोएडा येथे राहणा-या सचिन मीना यांच्यावर प्रेम करते आणि मला त्यांच्या बरोबर राहायचं आहे...' असे याचिकेत म्हटले आहे. रिपोर्टनुसार .राष्ट्रपती यांच्याकडे विनंती केली आहे की जर मला माफी मिळणार असेल तर .सीमा पती सचिन बरोबर भारतात राहू शकते.
दरम्यान एवढंच नाही तर. या वेळी सीमा हिने गायक अदनान सामी यांच्या बद्दल देखील मोठे वक्तव्य तिने केले आहे. जर ते भारतात बराच काळ राहिल्या नंतर त्यांना भारताचं नागरिकत्व मिळू शकतं तर सीमाला देखील भारताचं नागरिकत्व मिळायला हवं .भारतात राहण्याची परवानगी मिळाल्या नंतर मी सन्मानाने भारतात राहू शकते...असं देखील सीमा हैदर म्हणाली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.