Soshal. : सकाळी सहा वाजल्यापासून पुणे मेट्रो धावणार अजित पवार यांचा आदेश

पुणे दिनांक १४ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे मेट्रो आता सकाळी सहा वाजल्यापासून सुरू राहणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार व पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मेट्रो प्रवाशांनी चांदणी चौकातील लोकार्पण सोहळ्या. दिवशी केली होती.याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेट्रो प्रशासनाला याबाबत सुचेना केल्यामुळे मेट्रो प्रशासनाने सकाळी सात वाजल्यापासून धावणारी मेट्रो ही आता सहा वाजल्यापासून धावणार आहे.असा नािर्णय मेट्रो प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.
दरम्यान याप्रकरणी पुणे मेट्रोच्या वेळापत्रका मध्ये बदल करण्यात आला आहे.नवीन वेळेनुसार आता सकाळी सहा वाजता ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.पुणे मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी एक तास लवकर सुरू करणार आहे.वेळापत्रकाचा बदल हा वनाझ स्थानक ते रुबीहाॅल हाॅस्पीटल या मार्गावर करण्यात आला आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानकांच्या वेळे मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.यामार्गा वरील सेवा सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत अशीच सुरु राहणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.