Navratri Festival : नवरात्रोत्सवात अंबाबाईचे दर्शन व्हीआयपीना, गरीबांना दर्शन नाही का?

कोल्हापुरातील नवरात्रोत्सवात ( Navratri Festival ) मध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी ज्यांना दर्शनासाठी ज्यांना रांगेत उभे राहायचे नाही. आशा व्हीआयपी साठी देवस्थान समितीने पेड ई पास सुविधा देवस्थान समितीने सुरू केली आहे. परंतु देवीच्या दर्शनासाठी व्हीआयपी दर्शनाला विरोध केला आहे. तसेच देवीला गरीबच भक्तांची प्रचंड गर्दी असते तसेच व्हीआयपी दर्शन संकल्पना राबविताना देवीच्या गरीब भक्तांमध्ये प्रचंड असा त्रिव असंतोष व्यक्त केला जात आहे. तसेच या संकल्पनेला हिंदुत्ववादी संघटनाने प्रचंड विरोध केला आहे.
सर्वसाधारण गरीब भक्तांची एक प्रकारे ई पास सुविधा चालू करून गरीब व श्रीमंत अशी दरी निर्माण व भेदभाव करण्याचा हा देवस्थान कमिटीचा प्रकार दिसतो.? व श्रीमंता पेक्षा गरीब भक्तांचे देवीला दर्शनासाठी येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. त्यांना या व्हीआयपी ई पास दर्शनामुळे त्यांच्यावर हा अन्याय नाही का! हा प्रश्न असंख्य भाविकांमध्ये उपस्थित होत आहे. ई पास साठी देवस्थान कमिटीने प्रत्येकी २०० रुपये असे शुल्क ठेवले आहे. दरम्यान देवस्थानच्या या निर्णयाला हिंदुत्ववादी संघटनेने प्रखर असा विरोध केला आहे. कोरोना काळात दोन वर्षे मंदिरे ही बंद होती. त्यामुळे गरीब भक्तांना देवदर्शन करवीर निवासी अंबाबाईचे करता आले नाही.
त्यामुळे आता प्रचंड गर्दी होणार आहे. आणि यातच आता व्हीआयपी दर्शन व ई पास सुविधा राबविणे म्हणजे गोरगरीब भक्तांवर हा मोठा अन्याय आहे. तसेच गोरगरीब भक्त व श्रीमंत असा भेदभाव होणार आहे. यावर देवस्थान समितीने या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा असे भाविकांचे त्यांना नम्र आवाहन आहे. यावर्षी विक्रमी भाविक करवीर अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणार आहे हा आकडा २५ लाखांची मर्यादा ओलांडणार असून हा आकडा पुढे जाण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे. पण यापेक्षा देखील जास्त भाविक येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे देवस्थान समितीने सुरक्षा रक्षक ठेवून चौकशी व्यवस्था ठेवावी अशी अनेक भाविकांची देवस्थान कमिटीला विनंती आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.