Mansoon : रायगड मधील आंबेनळी घाटात दरड कोसळली. महाबळेश्वरला जाणारी वाहतूक व्यवस्था कोलमडली

पुणे दिनांक १८ (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) रायगड मधून एक सकाळी माहिती हाती येत आहे. रायगड मधील आंबेनळी घाटात दरड आज पहाटे कोसळली आहे.या भागात पाच दिवसांन पाऊस तुफान कोसळत आहे.पाऊसांचा इतका जोर आहे की. घाट माथ्यावर दरडी कोसळण्याच्या घटना सतत घडत आहे. आज देखील एक मोठी दरड कोसळणून आंबेनळी घाटात चिरेखिंडी येथे दरड कोसळणून महाबळेश्वर व पोलादपूर कडे व पोलादपूर रून महाबळेश्वरला येणारी वाहतूक व्यवस्था संपूर्ण कोलमडली आहे.
प्रशासनाच्या वतीने दरड हाटविण्याचे काम युध्द पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत .आज दुपारी प्रयंत दरड हाटविण्याचे काम होईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान या घाटातून प्रवास न करण्याटे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे. या भागातील वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. दरम्यान या भागात येत्या पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्या मुळे दरडी कोसळण्याच्या घटना सतत घडणार आहेत .तरी वाहन चालक यांनी सतर्कतेने प्रवास करावा असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.