Bandatatya Karadkar : बंडातात्या कराडकर यांना पक्षाघाताचा सौम्य झटका

हभप बंडातात्या कराडकर यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला आहे. त्यांच्यावर सातारा जिल्ह्यातील फलटण इथल्या निकोप हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. बंडातात्या यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती निकोप रुग्णालयातील डॉक्टर जे टी पोळ यांनी दिली.
किर्तनकार आणि वारकरी सांप्रदायातील बंडातात्या कराडकर हे काल फलटणमध्ये होते. यावेळी त्यांना त्रास झाला त्यामुळे त्यांना निकोप रूग्णालयात दाखल करण्यात आले. पुढच्या आवश्यक उपचारांसाठी त्यांना पुण्याला हलवण्यात आले आहे.
डाक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना पक्षघाताचा झटका आला आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. बंडातात्या कराडकर हे ७० वर्षाचे आहेत.
वारकरी संप्रदायातील धडाडीचे आणि राज्यभर व्यसनमुक्तीची चळवळ चालवणारे हभप असे बंडातात्या कराडकरांना ओळखले जातात.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.