Bus caught fire in Mumbai : वांद्रेमध्ये 'बेस्ट' भीषण आग, मुंबईत मोठा अनर्थ टळला!

मुंबईकरांसाठी लोकलनंतर दुसरी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट बसला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात एका बेस्ट बसला आग लागली. घटनेवेळी बसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करत होते.
ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही. बसला अचानक आग लागल्याने उपस्थित प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशी प्रसंगावधान दाखवत बसमधून खाली उतरले. यामुळे मोठा अनर्थ टळला.
बेस्ट बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत सुदैवाने कुठलीही मोठी दुर्घटना घडलेली नाही. मात्र, बेस्ट बसला अचानक आग लागण्याच्या घटना वाढल्याने प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Mumbai News, Bus caught fire in Mumbai News, Mumbai Social News, latest Mumbai marathi news and Headlines based from Mumbai City. Latest news belongs to Mumbai crime news, Mumbai politics news, Mumbai business news, Mumbai live news and more at Polkholnama.