Soshal : पिंपरीच्या रेल्वे स्टेशनचे भूमिपूजन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

पुणे दिनांक ३ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) पुणे मेट्रो स्टेशन उदूघाटन नंतर आता पिंपरी रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरणांचे भूमिपूजन प्रधानमंत्री मोदी ऑनलाईन करणार आहेत देशातील रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने ' अमृत भारत स्टेशन ' योजना हाती घेण्यात आली त्यामध्ये समाविष्ट पिंपरी-चिंचवड व आकुर्डी व मावळ मधील तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणावर एकूण ७० कोटी रूपये या साठी खर्च होणार आहेत.या कामांचे भूमिपूजन रविवारी दिनांक ६ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन करणार आहेत.
दरम्यान पंतप्रधान मोदी हे १ ऑगस्ट रोजी पुण्यात येऊन गेले त्यावेळी त्यांनी पुणे मेट्रोच्या दुस-या टप्प्यांचे उदूघाटन ऑनलाईन केले होते. ते नंतर ते आता मध्य रेल्वेच्या दोन स्थानकांचा कायापालट करण्याच्या कामाचे भूमिपूजन रविवारी ऑनलाईन करणार आहेत.या दोन स्थानकांसह चिंचवड व देहूरोड या इतर दोन स्थानकांचे सुशोभीकरण याच योजनेच्या दुस-या टप्प्यात केले जाणार आहे.
एकंदरीत या चार स्थानकांचा अमृत योजनेत समावेश करण्यासाठी आपणच पाठपुरावठा केला होता. असे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. सुशोभीकरणासह या स्थानकांचा विस्तारही केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तळेगाव दाभाडे व आकुर्डी रेल्वे स्थानक यांचा विस्तारीकरण करीता ४० कोटी ३५ लाख व ३३कोटी ८ लाख रूपये खर्च या करीता होणार आहे. यात प्रामुख्याने फुटओव्हर ब्रीज.प्रतिक्षालय.स्वच्छता गृह.दिव्यांगासाठी सोयीसुविधा. लिफ्ट. मोफत वाय-फाय व भव्य असे वाहनतळ आदीचा यात समावेश आहे. पिंपरीतील रेल्वे स्थानक कामाचे ऑनलाईन भूमिपूजन रविवारी दिनांक ६ ऑगस्टला होणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.