Soshal : गणेशोत्सव चांगल्या उत्साही वातावरणात व थाटामाटात साजरा करा, पुणे पोलिसांचे सर्व गणेश मंडळ व कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे दिनांक ११ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर २०२३ रोजी असून त्यांचदिवशी गणपती बाप्पाचे आगमन होत असून याच पार्श्वभूमीवर जवळपास एक महिना अधीच पुणे पोलिसांनी गुरुवारी दिनांक १० ऑगस्ट रोजी पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली झोन एकच्या हद्दीतील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकारी यांची बैठक टिळक रोडवरील दुर्वांकुर सभागृहात सांयंकाळी ६ ते ९ या वेळेत पार पडली.यावेळी सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकारी यांनी त्यांना गणेशोत्सवा वेळी येणाऱ्या अडचणी बाबत सूचना मांडल्या आहेत.
दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील.पोलिस उपायुक्त परिमंडळ एक संदिप सिंह गिल.पोलिस उप आयुक्त वाहतूक शाखा विजयकुमार मगर . पोलिस उपायुक्त विशेष शाखा आर.राजा.यांनी यावेळी सर्व गणेश मंडळ व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले त्यानंतर पुणे शहर सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदाधिकाऱ्यांना सुचना वजा मार्गदर्शन केले.येणारा गणेशोत्सव चांगल्या व उत्साही वातावरणात व थाटामाटात पार पाडण्याचे आवाहन त्यांनी गणेश मंडळांना केले.
दरम्यान सदरच्या या बैठकीला अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील.पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल.पोलिस उपायुक्त वाहतूक शाखा विजयकुमार मगर.पोलिस उपायुक्त विशेष शाखा आर.राजा.सहाय्यक पोलिस आयुक्त विश्रामबाग विभाग वसंत कुंवर.सहाय्यक पोलिस आयुक्त फरासखाना विभाग अशोक धुमाळ.सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे एकचे सुनिल तांबे.सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे दोनचे सतिश गोवेकर.सहाय्यक पोलिस आयुक्त शाखा मौला सैय्यद.विश्रामबाग पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे.फरासखाना पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा.विश्रामबाग पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक गुन्हे दादासाहेब गायकवाड.फरासखाना पोलिस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप व विशेष शाखा व पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी तसेच अंमलदार या उपस्थित होते.या कार्यक्रमांचे प्रास्ताविक खडक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील माने यांनी केले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.