Politiks : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडीत ग्रामस्थांशी साधला संवाद

पुणे दिनांक १५ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मागील काही दिवसांपूर्वी इर्शाळवाडीतच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र दुर्घटना मुळे हादरला होता.अचानक पणे पाऊसामुळे दरड कोसळून अनेकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता.पण सरकार या ग्रामस्थांच्या पाठीमागे ठाम राहिले.सरकारने मदतीचा हात पुढे करून या भागातील नागरिकांनसाठी खालापूर चौकातील या भागात एक सुंदर गावच निर्माण केले.व ग्रामस्थांसाठी अन्न वस्त्र व निवारा या तीन मुलभूत सुविधा देण्यात आल्या.आज याच ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिवशी निवारा केंद्रांची पाहणी केली.व गावातील ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला आहे.
दरम्यान महाराष्ट्र सरकारने पूरवण्यात आलेल्या सुविधांन मध्ये वैद्यकीय सुविधा.लहान मुलांना साठी नर्सरी.खेळण्यासाठी मैदान २४ तास गरम पाणी.थंड पाणी.शौचाल्य.घनकचराव्यवास्थापण व तसेच सकाळ.दुपार व संध्याकाळी २०० जणांना जेवण या भागातील नागरिकांनसाठी राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून निवारा केंद्रांची निर्मिती केली आहे.अशा प्रकारच्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.व या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.