Controversy over statue of Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सांगलीत वाद

काहींना काहीं कारण काढून ऐतिहासिक महापुरुषांवरून वाद घडवून आणणे काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. आता असच एक प्रकरण सांगली जिल्ह्यात समोर येतंय.
सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे काही दिवसापूर्वी पहाटे अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
पुतळा उभारणीसाठी सरकारने परवानगी दिली नव्हती. त्यामुळे हा वाद पेटला आहे. गनिमी कावा करुन शिवप्रेमींनी हा पुतळा बसवला होता.
आठ दिवसापूर्वी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंगळवारी शिवप्रेमींनी या पुतळ्याजवळ महाआरती करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर प्रशासनाने पुतळा परिसरात बंदोबस्त वाढवला होता. यावेळी परिसरामध्ये 144 कलम लागू करण्यात आलं होतं.
आंदोलक महाआरती करण्यावर ठाम होते. शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविण्याच्या हालचालीची कुणकुण शिवप्रेमींना लागली होती. त्यामुळे त्यांनी सांगली- इस्लामपूर रस्त्यावर ठिय्याआंदोलन सुरु केले होते. यामुळे परिसरात काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. त्यामुळे येथे काही काळ तणाव होता.
मंगळवारी या संपूर्ण परिसरातील वीज खंडीत करण्यात आली होती. रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. आंदोलकांना पोलसांनी ताब्यात घेतलं आहे.या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांत आहे. भाजपचे नेते निशिकांत पाटील यांच्यासह शिवप्रेमींना ताब्यात घेण्यात आले आहे. आता येथील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.