Soshal. : पंढरपूरात विठ्ठलाच्या दर्शना साठी रांगेत उभ्या असलेल्या वयो वृद्धं भावीकाचा मृत्यू

पुणे.दिनांक २३.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम ) पंढरपूरात आषाढी वारीच्या पाश्र्वभूमीवर लाडक्या विठ्ठल रूखुमाई च्या दर्शनास असंख्य भाविकांची पाऊले पंढरपूरात पडले असून दर्शन रांगेत उभे असलेले वयो वृध्द भावीकाचा मृत्यू झाला आहे. दर्शना आधीच भाविकांच्या मृत्यूनंतर अनेक भाविकांनी हळ हळ व्यक्त केली आहे.
पंढरपूरात भाविकांकडून विठ्ठल रूखुमाई च्या दर्शना साठी भाविकांचा महापूर आला असून प्रचंड अशी गर्दी होऊ लागली आहे. तब्बल तीन किलोमीटर अंतरावर भाविकांकडून रांगा लागल्य आहेत. मंदिर प्रशासनाकडून भाविकांना अनेक सुविधा पुरविण्यात येत आहे. तसेच दर्शना करीता मंदिर २४.तास उघडे ठेवले आहे.प्रचंड अशा गर्दी मुळे दर्शन घेण्या करीता ७ ते ८ तास लागत आहेत. यातच २१.जून रोजी सकाळी पंढरपूरात एक दुर्देवी अशी एक घटना घडली दर्शन रांगेत उभे असलेले. वयोवृद्ध भाविक भगवान घनश्याम भोसले. ( वय ७६.राहणार वीटा) यांचा मृत्यू झाला आहे. ते दर्शन रांगेत ६.तास उभे होते. दर्शना पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्यानंतर असंख्य भाविकांकडून या वेळी हळ हळ व्यक्त केली.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.