Devendra Fadnavis created new post : देवेंद्र फडणवीसांनी तयार केली मुंबई पोलिसांत नवीन पोस्ट

खास व्यक्तींसाठी माणूस कुठल्या हद्दीत पर्यंत जाऊ शकतो याचे ताजे उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केलेली एक विशेष नियुक्ती. अगोदर अस्तित्वात नसलेले पद कोण्या एका व्यक्तीसाठी निर्माण करून त्याला त्या पदावर नियुक्त करणे हे जरा जास्तच झालं म्हणायचं.
बातमी आहे देवेन भारती यांना मुंबई चे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आल्याची. पण प्रश्न असा आहे कि विशेष पोलीस आयुक्त हे पद आधी तर अस्तित्वात नव्हते मग अचानक काय गरज निर्माण झाली? असो. तर मुंबई चे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असा शासन आदेश काढण्यात आलाय.
देवेन भारती हे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. २०१४ ते २०१९ दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात भारती हे शहरातील सर्वात शक्तिशाली आयपीएस अधिकारी होते.
विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, हे पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या अधिपत्याखाली सर्व पोलीस सह आयुक्तांच्या कामाचे सनियंत्रण आणि पर्यवेक्षण करतील.
तसेच, उक्त अधिनियमातील कलम ७ अन्व्ये एखादा पोलीस अधिकारी यास पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस सहआयुक्त नियुक्त करण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.