राज्यसरकारची यंत्रणा तोकडी.जादा ट्रेन सोडल्याचा फुसका बार : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर महापूर रेल्वे ट्रेनला प्रचंड गर्दी ट्रेन पकडण्यासाठी नागरिक उतरले रेल्वे ट्रॅकवर

पुणे दिनांक १७ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जादा रेल्वे ट्रेन सोडल्याचा राज्य सरकारचा फुसका बार आता उडाल्याचा स्पष्ट दिसत आहे.ठाण्यातील दिवा स्टेशन वर कोकणात गणेशोत्सवा साठी जाणाऱ्या गणेश भक्त यांची मोठ्या प्रमाणावर महापूर रेल्वे ट्रॅक वर उतरले आहेत.कोकणात जाण्यासाठी विषेश रेल्वे ट्रेन सोडण्यात आले आहेत.यावेळी रेल्वे ट्रेनमध्ये जागा पकडण्यासाठी साठी प्रवाशी रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला उभे होते.यादुष्यावरुन दिसून येते की हे राज्य सरकार कोकणवाशी साठी किती तत्पर आहे.व राज्य सरकारचा जादा ट्रेन सोडल्याचा दाखला फुसका बार निघाला आहे.
दरम्यान गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी हे आपल्या गावी कोकणात दरवर्षी जातात यावेळी राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले होते की आम्ही कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर विषेश रेल्वे ट्रेन सोडल्याचा दाखला केला आहे.पण प्रवाशांच्या महापूरामुळे सरकारची मोठ्या प्रमाणावर पोलखोल झाली आहे.विषेश रेल्वे ट्रेनला फक्त दोनच उभी डब्बे जोडण्यात आले आहे.व काही मिनिटांतच रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले.व नंतर ही रेल्वे ट्रेन पकडण्यासाठी साठी प्लॅटफॉर्म वर व दुसऱ्या बाजूला रेल्वे ट्रॅकवर प्रवाशांनी उतरुन ट्रेन धोकादायक पद्धतीने पकडण्यासाठी उतरले होते व रेल्वेचे टाईम टेबल देखील कोसळले आहे.ह्या ट्रेन ऊशिरा धावत आहेत.भाजपच्या वतीने विषेश रेल्वे ट्रेन सोडल्याचा दाखला देखील पोकळ ठरला आहे.कोकणा कडे जाताना महामार्गावर खड्ड्यांमुळे प्रवासी हे गावी कोकणात जाण्यासाठी रेल्वे ट्रेनने प्रवास करण्यावर जादा भर देतात आता विषेश रेल्वे ट्रेनला देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने रेल्वे प्रशासन व राज्य सरकार यांचा आता फुसका बार उडाला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.