Osho Aashram : ओशो आश्रमासमोर भक्तांचे आंदोलन

आचार्य ओशो रजनीश यांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातून ओशो भक्त आश्रमाच्या परिसरात दाखल झाले आहेत. मात्र, आश्रम प्रशासनाकडून (ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन) भक्तांना समाधीस्थळी जाण्यास, तसेच ओशो यांची माळ घालण्यास बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने भक्तांना समाधीचे दर्शन घेण्यापासून रोखता येणार नाही, असा निर्णय दिलेला असतानाही प्रशासनाची मुजोरी सुरु आहे. दरम्यान,बुधवारी सायंकाळी काही भक्तांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले. याविरोधात ओशो भक्तांनी आज सकाळपासून ओशो आश्रम, कोरेगाव पार्क पुणे येथे निषेध आंदोलन केले.
ओशोंचा अनुग्रह लाभलेले स्वामी चैतन्य किर्ती, स्वामी विठ्ठल आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. काही आंदोलकांनी ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या विश्वस्तांविरुध्द जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मीडियाशी बोलताना काही गंभीर आरोप करण्यात आले. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.