श्रावणमास : श्रावणमास मधील पहिल्या शनिवारी भाविकांची शनिशिंगणापूर मध्ये गर्दी

पुणे दिनांक १९ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) गुरुवारपासून दिनांक १७ ऑगस्ट पासून श्रावणमास चालू झाला असून आज श्रावणमासमधील पहिला शनिवार निमित्ताने शनिशिंगणापूर मध्ये हजारो भाविकांनी शनी दर्शनाचा लाभ घेतला आहे.पहाटे पासूनच शनी चौथऱ्यावर जलाभिषेक करण्यासाठी भाविकांनी ओल्या वस्त्रात गर्दी मोठ्या प्रमाणावर केली होती . पहाटे महाआरती झाल्या नंतर शनी चौथरा हा भाविकांनसाठी खुला केला होता.त्यानंतर असंख्य भाविकांनी चौथरावर जलाभिषेक केला .
शनिंशिंगणापूर येथे आज पहाटे पासून हजारो भाविकांनी पायी येऊन दर्शनांचा लाभ घेत होते.आज मंदिरात भाविकांची तुफान गर्दी उसळली होती.पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती.ती पूर्ण भरून गेली होती.यावेळी अभिषेक भवनात देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.तिथे मंत्र पठणनासाठी व पूजा पाठ अनेक भाविकांनी पुरोहित यांच्या हस्ते विधीवत पूजा केल्या. या वेळी भाविकांनी शनी मूर्तीला तेल अर्पण केले.जवळपास आज भाविकांनचा महापूर शनिशिंगणापूर मध्ये दाखल झाला होता.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.