IPS Vaibhav Nimbalkar : IPS वैभव निंबाळकर यांची डिआयजी

मुळचे पुण्याचे असलेले आसाम केडरचे भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकारी वैभव निंबाळकर यांची पोलिस महानिरीक्षकपदी (डिआयजी) बढती मिळाली आहे. निंबाळकर हे पुणे जिल्ह्यातील इंदापुर येथील तालुक्यातील सणसर गावचे रहिवासी आहेत. निंबाळकर हे "आयपीएस'च्या 2009 च्या तुकडीतील अधिकारी आहेत.
निंबाळकर हे आसाममधील कचार जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक असताना जुलै 2021 मध्ये आसाम-मिझोरम सीमावादातुन उसळलेल्या दंगलीत आसाम पोलिस दलातील 6 पोलिसांचा मृत्यु झाला होता. तर निंबाळकर यांना गोळ्या लागून ते जखमी झाले होते. उपचारातुन बरे झाल्यानंतर निंबाळकर पुन्हा सेवेत रुजु झाले. सध्या ते आसाम पोलिस दलात "व्हिजीलन्स ऍन्ड ऍन्टी करप्शन' विभागाचे पोलिस अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
काही दिवसांपुर्वीच त्यांना "डिआयजी' पदी बढती मिळाली आहे. त्याबद्दल बोलताना निंबाळकर म्हणाले, "डिआयजी'पदी नियुक्ती झाल्याचा खुप आनंद वाटतो. या प्रवासात व माझ्यावरील हल्ल्याच्या घटनेत सद्गुरु वामनराव पै यांचे विचार, जीवन विद्या मिशन परिवार, माझे कुटुंबीयांनी खंबीर साथ दिली. यापुढेही जास्तीत जास्त लोकाभिमुख प्रशासन देऊन सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्यावर माझा भर असेल.''
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.