Youth group workshop : जिल्हास्तरीय युवा गट कार्यशाळेचे १ डिसेंबर रोजी आयोजन

पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवा गटांसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे कार्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जिल्हास्तरीय युवा गटांची कार्यशाळा’ तसेच स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत ‘उद्योजकता विकास’ या कार्यक्रमांचे आयोजन १ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले आहे.
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, पोलिस स्टेशनसोर, येरवडा येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित कार्यशाळेत जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवा गटांनी सहभागी होण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती संगीता डावखर यांनी केले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Pune News, Youth group workshop News, Pune Social News, latest Pune marathi news and Headlines based from Pune City. Latest news belongs to Pune crime news, Pune politics news, Pune business news, Pune live news and more at Polkholnama.