Earthquake in Delhi : दिल्ली-NCR, यूपी आणि उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये पसरली घबराट

मंगळवारी दिल्ली-एनसीआरसह उत्तर प्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंडच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे पृथ्वी काही सेकंद हादरत राहिली. रिअॅक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.8 मोजली गेली.
भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी होती
कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना धक्के बसायला लागले. काही लोक ऑफिसमधून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी पोहोचले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.8 इतकी मोजण्यात आली आहे. दिल्लीतील भूकंपासह उत्तर प्रदेशातील संभल, मुरादाबाद, अमरोहा आणि रामपूर येथे दुपारी अडीच वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.
दिल्लीचे रहिवासी अमित पांडे म्हणाले, "मी सिविक सेंटरमधील एका ब्लॉकच्या पाचव्या मजल्यावर होतो. मला माझ्या पायाखालून खडखडाटाचा आवाज आला आणि थोडासा धक्का जाणवला, थोड्या वेळाने हादरे थांबले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.