Soshal. : दौंड ते पुणे दरम्यान ई एम यू लोकल लवकरच होणार सुरू दौंड करांची प्रतिक्षा आता संपली. So

पुणे.दिनांक २७.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम) दौंड ते पुणे असा रोज प्रवास करणाऱ्या व आप डाऊन करणाऱ्य असंख्य प्रवाशां साठी आनंदाची बातमी असून .अनेक वर्षांपासून असणारी प्रतिक्षा आता संपणार असून लोकल करिता मुंबई विभागातून पाच ई एम यू रेक पुणे विभागाला मिळाले असून .त्या मुळे लवकरच लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे.
दौंड ते पुणे व पुढे बारामती पर्यत दुहेरी मार्गचे विद्युतीकरण होऊन अनेक वर्ष झाले असून फक्त या मार्गावर ई एम यू रेक या विभागाला मिळत नव्हते या रेक संदर्भात लोकप्रतिनिधींकडून व प्रवासी संघटणान कडून रेल्वे प्रशासनाकडे पाठ पूरवठा चालू होता. दरम्यान दौंड येथून रोज पुण्यला येणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर असून या मध्ये अनेक कामगार वर्ग. दूधवाले भाजीपाला .शेतकरी वर्ग. विद्यार्थ्यां बरोबर अनेक छोटे मोठे व्यावसायिक व अन्य प्रवाशी वर्ग असे अनेकांची नाळ ही पुण्यशी जोडली आहे.असे लाखो प्रवासी रोज आप. डाऊन पहाटे पाच पसून रात्री बारा वाजेपर्यंत करित असतात. यात प्रामुख्याने दौंड. पसून केडगाव. यवत.उरूळी लोणी हडपसर व या मधील रेल्वे स्टेशन. मधील प्रवाशांचा देखील समावेश आहे. आता ई एम यू रेक मिळाल्यानंतर लोकल ट्रेन सेवा सुरू होणार आहे.दरम्यान सुरूवातीला आठ फेऱ्या चालू होण्यचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.