Soshal. : पुणे रेल्वे स्टेशन वर मोफत विधी सेवा व मध्यस्थी चिकित्सालयाचे स्थापन.

पुणे.दिनांक २१.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम ) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या वतीने जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्तांचे औचित्य साधून पुणे रेल्वे स्टेशन येथे मोफत विधी सेवा व मध्यस्थी चिकित्सालयचे उदघाटन करण्यात आले असून देशात प्रथमच या प्रकारचे चिकित्सालय रेल्वे स्टेशनवर स्थापन करण्यात आले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे. यांच्या मार्गदर्शना खाली रेल्वे स्टेशन पुणे स्टेशन आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास कामगार विभाग. सेंट्रल हाऊसिंग कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाल कामगारांचा बचाव व पुनर्वसन करण्या करीता. सात दिवसांचे विषेश अभियान राबविण्यात येणार असून आज रॅली काढून जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमा द्वारे सर्व गरजू व पीडित व्यक्ती तसेच अटकेत असणाऱ्या सर्व व्यक्तीना मोफत विधी सल्ला व सेवा पुरविण्यात येणार आहे.असे कार्यक्रम वेळो वेळी जिल्ह विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या वतीने घेण्यात येतील. असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सोनल एस पाटील यांनी या वेळी सांगितले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.